नोंदणी क्र.  
     मुखपृष्ठ  |  नविन नोंदणी  |  स्थळ शोधा  |  खात्यात प्रवेश   |  विभागवार चाफा वितरक यादी 
 
 
 
विवाह जुळविणा-या अनेक वेबसाईट्स आज बाजारात आहेत त्यात चाफाही आता विवाहाची संकल्पना घेऊन आलाय अस कुणाला वाटेल, पण तसं नाही. चाफाने लोकांना नेहमी चांगलच देण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातलाच हाही एक प्रयत्न. अनेक वेळा असा अनुभव येतो की या वेबसाईट्सवर नाव नोंदवल्यानंतर एखाद्या स्थळाशी संपर्क करावयाचा असल्यास तो लगेचच होत नाही. तुम्हाला अपेक्षित स्थळाची माहिती या वेबसाईट्स इमेलद्वारा कळवितात परंतु त्यांच्याशी संपर्क करावयाचा झाल्यास खूप वेळ वाट पाहावी लागते. त्यामुळे नाहक वेळ जातो. परंतु चाफावर ही अडचण तुम्हाला येणार नाही. चाफाची संकल्पना इतर वेबसाईट्सपेक्षा वेगळी आहे. चला तर मग चाफाचे असे काय वेगळेपण आहे ते पाहूया.
 
चाफावर नोंदणी करण्यासाठीचे शुल्क फक्त रू.८०० इतके आहे. शुल्क भरल्यापासून आपली जाहिरात ३ महिन्यांसाठी संकेतस्थळावर सक्रिय राहते. दिलेल्या कालावधीनंतर आपली चाफावर दिसणारी जाहिरात बंद होते त्यानंतर रू.८०० भरून तुम्ही आपली जाहिरात पुन्हा सक्रिय करू शकता. तुम्ही शुल्क भरले नाही व नुसते चाफाकर असाल तर तुम्ही आपली जाहिरात देऊ शकत नाहीत तसेच इतर स्थळांचे संपर्क क्रमांक व इमेल पाहू शकत नाही. परंतु तुम्ही जर नोंदणी शुल्क भरले असेल तर तुमची जाहिरात तुम्ही देऊ शकता आणि इतरांची संपर्क माहितीही पाहू शकता.
 
चाफावर नोंदणी करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. केवळ चार पाय-यांमध्ये आपला नोंदणी अर्ज भरून होतो. आवश्यकता नसलेली माहिती विचारून चाफाने अर्ज भरण्याची गुंतागुंत वाढवलेली नाही.
विवाहासाठी आवश्यक असलेलीच माहिती अर्जमध्ये भरावयास दिली आहे. त्यामुळे कमीत कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने हा अर्ज भरून होतो. जे मोठे मोठे व गुंतागुंतीचे अर्ज भरून कंटाळले आहेत त्यांना चाफावर अर्ज भरायला नक्कीच आवडेल.
 
एखाद्या स्थळाबरोबर आपले किती गुण जुळताहेत हे आपण थेट संकेतस्थळावरच पाहू शकता त्यासाठी तुम्हाला कुठेही जावयाची आवश्यकता नाही. आम्ही अभ्यासपूर्ण पद्धतीने गुणमिलनाचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. तुमची नाडी, रास, नक्षत्र, चरण इत्यादी माहितीच्या आधारावर सॉफ्टवेअर गुणमिलन करून आपल्याला दाखवते, त्यामुळे ते अचूक असते. फक्त आपण माहिती भरताना अचूक माहिती भरली पाहिजे, तरच गुणमिलन अचूक येईल. आपल्याला ही माहिती माहीत नसल्यास आपल्या जन्मपत्रिकेत ही संपूर्ण माहिती मिळेल. कृपया चुकीची माहिती भरू नये. संकेतस्थळावर फक्त गुणमेलन दाखविले जाईल. कुंडलीमेलनाचे मार्गदर्शन आपण आपल्या ज्योतिषाकडून घेऊ शकता.
 
आपण जर नोंदणी शुल्क भरले नसेल तर आपणास फक्त स्थळांची माहिती दिसते तसेच तुम्ही तुमची जाहिरात चाफावर दाखवू शकत नाही. परंतु तुम्ही चाफावर नोंदणी केली असेल तर तुम्हाला स्थळांचा थेट संपर्क क्रमांक किंवा इमेल आयडी मिळतो. हा संपर्क क्रमांक विवाह इच्छुक वधु वा वराचाच असला पाहिजे असे नाही तुम्ही जबाबदार व्यक्तीचा नंबर तेथे टाकू शकता उदा. आई-वडील, नातेवाईक जे बोलणी करण्यास समर्थ आहेत त्यांचा नंबर इथे असला पाहिजे. लग्न जमविण्यात आम्ही कोणत्याही प्रकारे मध्यस्ती करीत नाही की विवाह जुळल्यानंतर फीसुद्धा घेत नाही. आम्ही फक्त स्थळांची जाहिरात देतो. त्यामुळे बोलणी, चौकशी हा भाग स्थळांनी स्वतःच ठरवायचा आहे.
 
आपण ज्या अपेक्षा नोंदणी अर्जात भराल त्याच अपेक्षेनुसार आपल्याला दाखविण्यात येणारी स्थळं शॉर्टलिस्टेड केली जातील. त्यामुळे तुमच्या अपेक्षेप्रमाणे असलेली स्थळेच आपण पाहू शकाल, जी स्थळे आपल्या अपेक्षेनुसार नसतील ती आपल्याला दिसणार नाहीत. त्यामुळे नेमक्या पद्धतीने आपण आपल्या अपेक्षेनुसार स्थळ शोधू शकता. म्हणूनच अर्ज भरतानाच आपल्या अपेक्षा काय आहेत त्या आळस न करता सर्व नोंदविल्या पाहिजेत. चाफाने अगदी लहान लहान गोष्टींचा विचार करून या अपेक्षा लिहिल्या आहेत, परंतु त्याचवेळी अर्ज खूप मोठा होणार नाही याचीही काळजी घेतली आहे. आपल्या शोधकार्यात नेमकेपणा यावा म्हणून ही अर्जाची ही पायरी चाफाने सामील केली आहे.
 

चाफाचे वेगळेपण वरील मुद्यांवरून आपल्या लक्षात आलेच असेल परंतु चाफाचे आणखी एक वेगळेपण आहे ते म्हणजे चाफा विवाह कार्ड.

नोंदणी शुल्क भरण्यासाठी विविध मार्ग चाफावर उपलब्ध आहेत.

*आपण HDFC बँकेत चेक भरू शकता.
*क्रेडिट कार्डद्वारे शुल्क भरु शकता.
*तसेच विवाह कार्डद्वारे हे शुल्क भरू शकता.

हे विवाह कार्ड काय आहे? असा प्रश्न तुमच्या मनात येईल. आपण नोंदणी अर्ज भरल्यानंतर शुल्क भरण्यासाठी वरील कोणताही पर्याय निवडू शकता. HDFC बँक आपल्या जवळच्या परिसरात असेलच असे नाही तसेच सर्वच जण क्रेडिट कार्ड वापरतातच असेही नाही. काहींना क्रेडिट कार्डद्वारे केलेले पेमेंट सुरक्षित वाटत नाही. तेव्हा हे शुल्क भरण्यासाठी आपण चाफा विवाह कार्डचा वापर करु शकता. हे एक प्रकारचे स्क्रॅच कार्ड आहे, ज्यावर गुपित १६अंकी युझरनेम आणि ४ अंकी पिन क्रमांक लिहिलेला असतो. अर्ज भरून झाल्यानंतर आपण विवाह कार्डद्वारे पेमेंट करण्याचा पर्याय निवडला की तुम्हाला युझरनेम व पासवर्ड विचारला जाईल. आपण विकत घेतलेल्या या कार्डवरील माहिती भरल्यावर आपले अकाऊंट लगेचच सक्रिय होईल. या कार्डची किंमत म्हणजेच नोंदणी शुल्क आहे. आपल्याला वेगळे नोंदणी शुल्क भरावयाचे नाही हे ध्यानात घ्यावे. हे कार्ड विकण्यासाठी आम्ही विभागवार प्रतिनिधी नेमले आहेत त्या वितरकांची यादी आम्ही दिली आहे. काही वितरक हे कार्ड घरपोच देण्याचीही सुविधा देतात.

 

 
 
 
नाटक   |  सदर   |  दर्शन   |  स्वाद   |  हास्य   |  विवाह  |  नोकरी   |  जाहिरात करा  |  प्रतिक्रिया © Panaceea  | Best viewed in 1024 x 768 resolution